ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


। पुणे । दि.13 फेब्रुवारी । ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासनाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वर्गीय पद्मभूषण राहुल बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनीही स्वर्गीय बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

स्वर्गीय बजाज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संजय आसवले, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post