। मुंबई । दि.14 फेब्रुवारी । मराठा आरक्षण व समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून आमरण उपाेषण करणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. हे आंदाेलन आझाद मैदानावर असेल असे राजेंनी नमूद केले.
मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविलेली आहे असे युवराज संभाजीराजेंनी स्पष्ट केले. संभाजीराजे महाविकास आघाडीसरकारवर प्रचंड नाराज झाल्याचे आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा जाणवले.
संभाजीराजे म्हणाले मराठा आरक्षणासाठी आंदोलन केली. सर्व पक्षातील नेत्यांना भेटलाे. परंतु समाजासाठीच्या मांडत असलेल्या मागण्या पूर्ण हाेत नाहीत हे लक्षात आलं आहे. आजपर्यंत आम्ही आक्रमकरित्या आंदाेलनं केली परंतु आता मी स्वतः उद्विग्न झालो आहे अशी खंतही खासदार संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली.
मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतू खुप दिवसांनंतर याचीका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
Tags:
Breaking