वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या शेवगावच्या चेअरमनदी भाऊसाहेब भाकरे पाटील


।अहमदनगर । दि.16 जानेवारी । वीज तांत्रिक कामगार सहाकरी पतसंस्था मर्या,शेवगांव तालुका शेवगांव जिल्हा अहमदनगर या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र प्राप्त संस्थेच्या चेअरमनपदी बालमटाकळीचे सुपुत्र भाऊसाहेेब बाबासाहेब भाकरे पाटील यांचीतर व्हाईस चेअरमनपदी नवनाथ कचरु पोटफोडे तर मानद सचिव पदी लक्ष्मण निवृत्ती सोलाट यांची बिनविरोध निवड झाली.

तीनही निवड झाल्याबद्दल यांचे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री नागोराव मगर, सरचिटणीस सयद जहीरुद्दीन, वजी तांत्रिक कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी स्वागत केले. संस्थेची सभा दि.7 जानेवारी रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय शेवगांव येथे झाली. सभेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक के.के.आव्हाड यांनी काम पाहिले.

भाऊसाहेब भाकरे पाटील यांनी चेअरमनपदासाठी सुचना संचालक संतोष आत्माराम जगताप यांनी केली तर सदर सुचनेस संचालक माधव कारभारी पटारे यांनी अनुमोदन दिले. तर नवनाथ कचरु पोटफोडे यांनी व्हाईस चेअरमन पदासाठी शिवाजी रामदास चितळकर यांनी सुचना केली तर सचिन पोपट मुळे यांनी सदर सुचनेस अनुमोदन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post