। अहमदनगर । दि.15 जानेवारी । श्रीरामपूर बाभळेश्वर रस्त्यावर प्रभात डेअरीजवळ भरधाव वेगातील पल्सर मोटारसायकलवरील (क्रमांक एमएच 17 बीयु 7633) चालक सद्दाम हबीब शेख याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगातील लिंबाच्या झाडाला धडकून अपघात केला.
धडक इतकी जोरात होती की दुचाकीचालक सद्दाम हबीब शेख (वय 25 रा.वॉर्ड नं.2 श्रीरामपूर) व त्याचा मित्र शुभम भगवानराव पतंगे (वय 19, रा.सरस्वती कॉलनी,वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) हे दोघेही या अपघातात ठार झाले तर कुमेल कादर जुनानी (वय 22, रा. वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) हा जखमी झाला.
श्रीरामपूर शहर पोलिसांनी या प्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपासानंतर पोलिस नाईक साईनाथ राशीनकर यांच्या फिर्यादीवरुन मृत दुचाकी चालक सद्दाम हबीब शेख याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक फौजदार हापसे करीत आहेत.
Tags:
Ahmednagar