। सांगली । दि.19 जानेवारी । स्व.आर.आर.पाटील (आबा) यांचे स्वप्न होते की कवठेमहांकाळ नगर पंचायतीमध्ये एकाहाती सत्ता राष्ट्रवादीच्या हाती असावी हे आबांचे स्वप्न पुर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यानीं दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. युवा नेता म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिले जाते. रोहित पवार यांनी कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला आहे.
रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता.
निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.
निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही, असं रोहित पाटील म्हणाले होते. आता निकालानंतर रोहित पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली.रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही
Tags:
Breaking