खासगी क्लासेसवर कोरोना नियमावली अंतर्गत कारवाई

। अहमदनगर । दि.19 जानेवारी । अहमदनगर महापालिका कोरोना दक्षता पथकाला बालिकाश्रम रोड येथील ज्ञानप्रबोधिनी लक्ष अकॅडमी येथे काही विद्यार्थी व शिक्षक हे विनामास्क आढळले. त्यामुळे तेथे दंडात्मक कारवाई करून 500 रुपये प्रमाणे 16 विद्यार्थी व शिक्षक यांना एकूण 8 हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच तेथे आणि परिसरातील बाकी क्लास चालकांना मास्क वापरण्याबाबत व सॅनिटायझर वापरण्याबाबत आणि सोशल डिस्टंसीग बाबत सूचना दिल्या गेल्या.

मनपा दक्षता पथकातील नंदकुमार नेमाणेे, राजेंद्र बोरुडे, राहुल साबळे, अमोल लहारे, भीमराज कांगुडे, नंदकुमार रोहोकले, गणेश वरूटे, विष्णू देशमुख, अमित मिसाळ, दीपक सोनवणे, गणेश धाडगे, अनिल कोकणी आदींनी कोरानाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन कोरोना नियमावली जनजागृती तसेच नियम मोडणारांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या पथकाद्वारे माळीवाडा जुने मनपा ऑफिस परिसर, माळीवाडा ते बस स्थानक परिसर येथे मास्क लावणबाबत नागरिकांना सूचना देण्यात आली.

या ठिकाणी पथकातील अनिल लोंढे, तुळशीराम जगधने, संदीप वैराळ, आप्पासाहेब सुपेकर उपस्थित होते, अशी माहिती दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांनी दिली. दरम्यान, शहरात व उपनगरात खासगी ऑफिसेस, दुकानदार, व्यापारी व नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे. नियमांचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शंकर गोरे आणि उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post