दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू


। अहमदनगर । दि.07 जानेवारी । दोन मोटारसायकलच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला व एक जखमी झाला. भरधाव वेगातील दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या धडकेत मोटारसायकलवरील बिभीषण दादासाहेब गिते (वय 22, राहणार पांगुळगव्हाण, आष्टी, जि. बीड) यांचा मृत्यू झाला तर महादेव आदिनाथ गिते हे गंभीर जखमी झाले.

ही घटना जामखेड ते खर्डा रोडवरील वटेवाडी शिवारातील सागर हॉटेल जवळील रोडवर वटेवाडी येथे घडली. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी महादेव आदिनाथ गिते (वय 24, राहणार पांगुळगव्हाण, आष्टी, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक भागवत करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post