आज 1431 रूग्णांना डिस्चार्ज तर
नव्या 1134 बाधितांची रुग्ण संख्येत भर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.14 टक्के
। अहमदनगर । दि.26 जानेवारी । जिल्ह्यात आज 1431 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 59 हजार 149 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.14 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1134 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 11168 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 505 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 277 आणि अँटीजेन चाचणीत 352 रुग्ण बाधीत आढळले.
हे देखील वाचा...राज्यातील ‘या’ भागात गारठा वाढणार; हवामान खात्याचा अंदाज
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 76, अकाले 188, कर्जत 02, नगर ग्रा. 24, नेवासा 14, पारनेर 55, पाथर्डी 24, राहता 02, राहुरी 02, संगमनेर 24, शेवगांव 03, श्रीगोंदा 54, श्रीरामपूर 15, मिलिटरी हॉस्पिटल 15 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 77, अकोले 15, जामखेड 02, कर्जत 06, कोपरगाव 08, नगर ग्रा. 17, नेवासा 05, पारनेर 06, पाथर्डी 06, राहाता 55, राहुरी 06, संगमनेर 07, शेवगाव 02, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 21, कॅन्टोन्मेंट बोर्ड 02, मिलिटरी हॉस्पिटल 24 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.
हे देखील वाचा...डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता २०० करण्यास परवानगी
अँटीजेन चाचणीत आज 352 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 89, अकोले 01, जामखेड 26, कर्जत 20, कोपरगाव 14, नगर ग्रा. 25, नेवासा 14, पारनेर 09, पाथर्डी 63, राहाता 16, राहुरी 20, संगमनेर 06, शेवगांव 06, श्रीगोंदा 20, श्रीरामपूर 18 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 522, अकोले 48, जामखेड 28, कर्जत 34, कोपरगाव 34, नगर ग्रा 119, नेवासा 52, पारनेर 109, पाथर्डी 73, राहाता 112, राहुरी 30, संगमनेर 48, शेवगांव 27, श्रीगोंदा 25, श्रीरामपूर 78, कॅन्टोनमेंट बोर्ड 19, मिलिटरी हॉस्पिटल 20, इतर जिल्हा 49 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
हे देखील वाचा...नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री हसन मुश्रीफ
*बरे झालेली रुग्ण संख्या : 3,59,149
*उपचार सुरू असलेले रूग्ण : 11168
*पोर्टलवरील मृत्यू नोंद : 7174
*एकूण रूग्ण संख्या : 3,77,491
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक 26 जानेवारी, 2022
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या