। मुंबई । दि.26 जानेवारी । गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात थंडी वाढली आहे. आता पुन्हा राज्यभरात थंडीच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.पुढील पाच दिवसामध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या किमान तापमानात घट होणार असून गारठा वाढणार आहे.
सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. हे पाहता येत्या पाच दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3-5 डिग्री सेल्सीयसने घटणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी 25 आणि 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडी जाणवेल.
मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवलं गेल आहे. तसेच मुंबईतील कमाल तापमानात देखील घट नोंदवली गेली आहे. रविवारी सांताक्रुझ वेधशाळेत कमाल तापमान 23.8 अंश सेल्सिअस इतक नोंदविण्यात आला आहे .
दरम्यान राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, मका या पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.