। अहमदनगर । दि.15 नोव्हेंबर । बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व आतील सुमारे तीन हजार रुपये किमतीच्या धान्याची चोरी केली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील इंदिरानगर येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की मंदाकिनी अरुण दाते (राहणार तुळजापूर पेठ, तिसगाव, पाथर्डी) यांचे इंदिरानगर येथे किराणा दुकान आहे. या दुकानाचा कडीकोयंडा तोडून कुणीतरी अज्ञात चोरांनी आतील 22 किलो गहू, 22 किलो तांदूळ,
बारा किलो तांदूळ, 18 किलो चना, एक स्टोह, एक शेगडी असा दोन हजार आठशे चोवीस रुपयाचे धान्य व साहित्य चोरून नेले. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक नवगिरे करीत आहे.