। अहमदनगर । दि.14 नोव्हेंबर । वीज महामंडळाच्या स्थानिक पथकाने शहरात वीज चोरी करणाऱ्या आठरा ग्राहकांना ग्राहकांना सुमारे तीन लाख ८६ हजाराचा दंड केला आहे.
पाथर्डी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता मयुर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
झिरो ते तीस युनिट वापर असलेल्या संशयित ग्राहकांची तपासणी पथकाकडून करण्यात आली. यामध्ये १८ ग्राहकांनी सुमारे २५ हजार युनिट वीज चोरी केल्याचे पथकाच्या लक्षात आले. या सर्व वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना पथकाने तीन लाख ८६ हजार दंड केला आहे.
या पथकात सहाय्यक अभियंता मयूर जाधव, हरिश्चंद्र पोपळघट, प्रियंका मुंडे, सुदर्शन शिरसाट, नितीन खेडकर, अरुण दहिफळे, किरण मरकड, सोमनाथ शिरसाट, आदी सहभागी झाले होते.
पुढील काळात वीज चोरीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. वीज चोरी करणाऱ्यांवर पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता मयुर जाधव यांनी सांगितले.