। अहमदनगगर । दि.13 नोव्हेंबर । नेप्ती उपबाजार समितीत 1 नंबर कांद्याला सुमारे 2800 रुपये भाव मिळाला. आज 46 हजार 798 गोण्याची आवक झाली आहे. कांद्याच्या भावामध्ये चढ उतार होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आज दि.13 नोव्हेंबर रोजी एकुण कांदा गोण्याची आवक 46 हजारा 798 झाली आहे. आज कांद्याचे भाव घसरले आहे. भाव घसरल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी होती. आज एकुण कांदा 25 हजार 738 क्विंटल बाजारात आला होता.
आज कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे
एक नंबर 1 कांद्याला 2100 ते 2800 भाव मिळाला.
दोन नंबर कांद्याला1400 ते 2100
तिन नंबर कांद्याला 600 ते 1400
तर चार नंबर कांद्याला 300 ते 600 रुपये भाव मिळाला.
तरी जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
Tags:
Ahmednagar