। अहमदनगर । दि.11 ऑक्टोबर । शहरातील स्टेशनरोडवरील संतोषी माता कॉलनीतील बंगला फोडणारे दोघे चोरटे कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. दोघाही चोरट्यांना शिरूर बसस्थानक येथून अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिणे जप्त करण्यात आले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
किशोर तेजराव वायाळ (वय 45 वर्षे, रा. मेरा बुद्रुक, ता. चिखली, जि. बुलढाणा) व गोरख रघुनाथ खळेकर (वय 34 रा. शिरसवाडी, ता. जालना, जि. जालना) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या चोरीच्या घटनेतील फिर्यादी हे सारसनगर येथे बंगला पाहाण्यासाठी गेले होते.
त्याचवेळी वरील दोघा चोरट्यांनी बंगला फोडून आतून सुमारे सोने-चांदीचे दागिणे, रोकडे असा एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस कर्मचारी याकूब सय्यद, सुमीत गवळी, दीपक कैतके, भागवते आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.