बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर विभागतर्फे पोलीस कर्मचारी व
मनपा सफाई कामगारासाठी मास्क व हेंडग्लोजची मदत
नगर (दि.09) : कोरोना विषाणूच्या विरोधात दिवसरात्र मेहनत करणार्या पोलीस बांधव व मनपा सफाई कर्मचारी यांच्या सूरक्षिततेसाठी अहमदनगर विभाग बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे बँकेचे क्षेत्रिय व्यवस्थापक राजीव कदम यांच्या हस्ते मास्क व हेंडग्लोज पोलीस उपअधिक्षक प्रांजली सोनवणे व मनपा उपायुक्त सुनील पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.यावेळी निवृत्त अधिकारी विनायक पवळे , माधुरी कर्डिले, मनपाचे निकम ,मनपा कर्मचारी संघटनेचे आनंद लोखंडे, शेखर देशपांडे, श्री.शशिकांत नजान आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी व सध्याची गरज पाहता बँकेने नगर शहरात पोलीस व मनपा सफाई कर्मचार्यासाठी प्रत्येकी 1000 मास्क व 500 हेंडग्लोजच्या संचाची मदत केली आहे. तसेच नगरमधील महत्वाच्या तालुक्यातही अशा प्रकारची मदत केली आहे अशी माहिती श्री. राजीव कदम यांनी दिली.तसेच यापुढे परिस्थिती पाहून पुन्हा अशा प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन ही त्यांनी दिले.

Tags:
Ahmednagar