अर्बन चा बिगूल वाजला : 28 नाव्हेंबरला निवडणूक

। अहमदनगर । दि.11 ऑक्टोबर । व्यापारी क्षेत्रातील महत्त्वाच्या मानणार्‍या नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी दि.28 नोव्हेंबरला मतदान होणार असून दि.30 नोव्हेंबरला मतदमोजणी होणार आहे.

बँकेच्या 18 जागांसाठी निवडणुक होत असून यासाठी मनपा व भिंगार छावणी मंडळ मतदारसंघ (12 जागा )  त्यामध्ये 1 महिला राखीव, 1 अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती राखीव, महाराष्ट्र राज्य मतदारसंघ (5 जागा)  - त्यात 1 महिला राखीव, महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्राबाहेरील मतदारसंघ (1  जागा) असे आहे. बँकेसाठी 55 हजार 991 मतदार आहेत.

संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी ही निवडणुक होत आहे. निवडणुकीचा बिगूल वाजल्याने इच्छुकांच्या हालचालीनी वेग घेतला आहे. आज बँकेची प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

बँकेतील गैरव्यवहारामुळे ही बँक चर्चेचा विषय राहिली आहे. बँकेतील गैरव्यवहारावर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये निवडणूक अपेक्षीत होती. मात्र, बँकेच्या एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासनाची नियुक्ती केली होती. गेल्या दोन वर्षापासून जवळपास प्रशासक राज आहे.

या निवडणुकीमुळे आता प्रशासक राज संपणार असून लवकरच निवडणुक होऊन संचालकांची निवड होणार आहे. यामधुन प्रशासक राज संपणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी दिग्वीजय आहेर यांनी आज सकाळी प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल -
उमेदवारी अर्ज - 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी - 3 नोव्हेंबर
वैध उमेदवारांची यादी - 8 नाव्हेंबर
चिन्हवाटप 15 नाव्हेबंर
मतदान - 28 नाव्हेंबर
मतमोजणी - 30 नाव्हेंबर रोजी होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post