जिल्हा रुग्णालय परिसरात शिव भोजनालय सुरु करावे

नगर (दि.03) प्रतिनिधी -
महाराष्ट्र सरकारने शिव भोजनालयाची योजना सुरु केली असून नगरमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात हे भोजनालय सुरु करावे अशी मागणी स्वराज्य रक्षक संघर्ष संघटनेने केली आहे.
यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, जिल्ह्याचा केंद्र बिंदु असलेले जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा न्यायालय, एस.पी. ऑफिस, तारकपूर बस स्टँण्ड याठिकाणी जिल्ह्यातील सर्व गोरगरीबांची ये-जा असते. विशेषताः जिल्हा रुग्णालय हे आपल्या नियंत्रणाखाली असून तेथे गेल्या 2 वर्षापासून जेवणाची कसली सुविधा नाही.
तरी एक समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून या परिसरात जिल्ह्यातील येणार्या गरीब लोकांना शिव भोजनालयाचा फायदा होईल. त्यासाठी जिल्हा रुग्णालय शेजारी हे शिव भोजन चालु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी गणेश नलगे, स्वप्निल पाठक, साईनाथ घोरपडे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post