सोन्याच्या दरामध्ये घसरण तर चांदीच्या दरात वाढ...जाणून घ्या भाव

सोन्याच्या दरामध्ये घसरण तर चांदीच्या दरात वाढ...जाणून घ्या भाव

। मुंबई । दि.16 ऑक्टोबर । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहिला मिळत आहे. तर दुसर्‍या बाजुला आंतराष्ट्रीय मौल्यावान धातूच्या किंमती आणि रुपयांच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47 हजार 070 रुपये आहे.

मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,970 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 63,600 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

आजच्या भावामध्ये किती वाढ झाली आणि किती कमी झाले हे पाहणे गरजचे आहे.  गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,070 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,070 प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,090 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,350 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,070 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48,070 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 636 रुपये आहे.

कालच्या आणि आजच्या दरामध्ये 4 रुपयांचा फरक आहे. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर?
सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.


Post a Comment

Previous Post Next Post