आजही पेट्रोल अन् डिझेल महागलं...सर्वसामान्यांचे बजेट सनासुदीच्या दिवसात कोलमडणार!

। पुणे । दि.16 ऑक्टोबर । गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर गगनाला भिडच चालले आहे. यामधुन सर्वसामान्यांचे बजट कोलमडताना दिसत आहे. यातच आता रिक्षाभाडे वाढण्याची शक्यता देखील समोर उभी राहण्याची शक्यता आहे. यातुन सर्वसामान्य भाववाढीने चांगलेच हैरान झाले आहे. आजही पेट्रोल आणि अझेलची भाववाढ पाहिला मिळत आहे. पुण्यात डिझेलने 100 पार केली आहे.

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. या वाढत्या पेट्रोल दराला कुठे थांबा मिळणार का नाही असाच काहीसा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे. याबद्दल सध्या कोणीच काही सांगू शकत नाही असाच सुर गवसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या किंमती भडकत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.

पेट्रोल डिझेल दर वाढ झाल्याने महागाई देखील शिखरावर पोहचली आहे. याचाच परिणाम म्हणून दोन दिवसांपूर्वीच पुणे आणि मुंबईतील रिक्षा संघटनानी देखील आपले प्रवासी भाडे वाढवले आहे.देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली असताना आज डिझेलनेही शतकाचा टप्पा गाठला आहे. डिझेल 100.08 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.

पेट्रोल - 110.92 प्रतिलिटर

पॉवर पेट्रोल -114.60

डिझेल - 100.08 प्रतिलिटर

सीएनजी - 62.10 प्रतिकिलो


100 रुपयांमध्ये एक लिटर पेट्रोल देखील मिळत नसल्याची महागडी वेळ सर्वसामान्यांच्या जीवनात आली आहे. याला महागाईचा परमोच्च बिंदूच मानावे लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर कमी झाले आणि जास्त झाले तरीही सामान्यांना त्याबद्दल कोणतेही सोईरसुतक असल्याचे दिसत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post