। मुंबई । दि.13 मार्च । पोलीस बदल्यांच्या घोटाळा आरोप प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब आता घरीच नोंदवला जाणार आहे. फडणवीसांच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
योगेश कुमार गुप्ता हे स्थानिक डीसीपी फडणवीसांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. तिथल्या बंदोबस्ताबाबत आढावा घेतला जातोय. तर दुसरीकडे फडणवीसांच्या चौकशीमुळे राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेय आहेत.
देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीविरोधात अकोल्यात भाजपने आंदोलन केलं. नोटीशीची होळी करण्यात आली. शहरातील जयप्रकाश नारायण चौकात भाजप कार्यकर्त्यांनी आमदार रणधीर सावरकर आणि गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं.. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Tags:
Politics