फायनान्सच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
युनूस पठाण या युवकाने 2018 साली 1 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले होते. या लोनच्या फेडीपोटी येणारे सर्व हप्ते सुरळीत भरून देखील पठाण याच्या खात्यातून बजाज फायनान्स कंपनीने 3 ऑक्टोबर रोजी 3 हजार 600 रुपये व पुन्हा 12 ऑक्टोबर रोजी 4 हजार 237 रुपये असे एकाच महिन्यात दोन वेळा हप्ते वर्ग करून घेतले होते.
यासंदर्भात तो बजाज फायनान्सच्या कार्यालयात विचारपूस करण्यास गेल्यावर या युवकास तेथील अधिकारी व कर्मचार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या युवकाने संगमनेर रोडवर असलेल्या बजाज फायनान्सच्या कार्यालयातच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याठिकाणी आलेल्या नागरिकांनी युवकाच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
Tags:
Crime