बाबुर्डी घुमटला मारहाण करून दागिन्यासह रोकड पळवली

बाबुर्डी घुमटला मारहाण करून दागिन्यासह रोकड पळवली

। अहमदनगर । दि.17 ऑक्टोबर ।  कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने दरवाजा उघडून बाहेर आलेल्या 57 वर्षीय शेतकर्‍यास चार अनोळखी चोरट्यांनी कटावणीने मारहाण करून त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 28 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. ही घटना नगर-दौंड रोडवरील बाबुर्डी घुमट येथे घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की महादेव दगडू येवले (वय 57, राहणार बाबुर्डी घुमट, तालुका नगर) हे त्यांच्या कुटुंबासह रात्री घरी झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी उठून दार उघडले व बाहेर आले असता बाहेर अंधारात दबा धरून बसलेल्या चार चोरट्यांनी 

त्यांना कटावणीने बेदम मारहाण केली आणि आरडाओरडा करू नये म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व त्यांच्या घरात घुसून घरातील कपाटामधील रोख रक्कम व येवले यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने तसेच मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन चोरून नेला. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post