राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

। पुणे । दि.17 ऑक्टोबर । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम म्हणून राज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याच्या पुणे विभागाचे वैज्ञानिक के.एस. होसाळीकर यांनी दिली.

होसाळीकर यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

नंदुरबार, गोंदिया, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, बीड, रायगड, पुणे, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

परंतु धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, लातूर, परभणी, जालना, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post