बारस्कर परिवाराने समाजाला वेगळा आदर्श घालून दिलाः ना. बच्चू कडू

ह.भ.प. स्व. साहेबराव बारस्कर यांच्या दशक्रियाच्या कार्यक्रमात दिली विविध संस्थांना देणगी व मदत


। अहमदनगर । दि.17 ऑक्टोबर ।  प्रहार वारकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.अजय महाराज बारस्कर यांचे वडील स्व.साहेबराव बारस्कर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत दहा दिवस प्रवचन, कीर्तन, भजन केले. दशक्रियाच्या दिवशी सामाजिक संस्थांना देणगी देत बारस्कर परिवाराने समाजाला वेगळा आदर्श घालून दिला असे मत शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजीमंत्री शिवाजी कर्डिले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, डॉ.अशोक विखे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब महाराज काशीद,  माजी महापौर बाबासाहेब वाकळे,नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, डॉ. नगरसेवक डॉ.सागर बोरूडे, नगरसेवक संपत बारस्कर,

न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य आर.एम.तांबे, नगरसेवक बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, निखिल वारे, नगरसेवक अशोक बडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.रफीक सय्यद, बहुजन मुक्तीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, दत्ता पाटील सप्रे, ह.भ.प.सखाराम महाराज म्हस्के, ह.भ.प. दत्तात्रय खांदवे, ह.भ.प. तुळशिराम लबडे महाराज, ह.भ.प. अमोल महाराज जाधव, ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज,  पत्रकार सूर्यकांत नेटके, ह.भ.प. शिवाजी महाराज मेटे, पत्रकार सुधीर लंके, सीताराम काकडे,  वाकोडी सरपंच गवळी, मा. सभापती अशोकराव झरेकर आदींसह सामाजिक, राजकीय व आध्यामिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

पुढे बोलताना ना. बच्चू कडू म्हणाले, की 2016 साली आसूड यात्रेच्या निमित्ताने बारस्कर महाराज यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांच्या घरी गेलो असता त्यांच्या घरी एका बाजूला जगद्गुरु तुकाराम महाराजांची मूर्ती होती तर दुसर्‍या बाजूला गौतम बुद्धांची मूर्ती होती. कार्यकर्त्यांना सहज विचारले महाराज बौद्ध धर्माचे आहेत का? कारण पुतळा, फोटो,  झेंडा यावर देशात जात आणि धर्म ठरला जातो. कारण आज राजकारणात तिच परिस्थिती आहे. आपल्या जातीचा असेल तरच मतदान केले जाते. मात्र, याला काही माणसे अपवाद असतात. मला असे वाटायचे की महाराज बौद्ध धर्माचे आहेत.
 
जेव्हा सगळी माहिती घेतली, तेव्हा कळाले की महाराज मराठा पाटील आहेत. विचाराने माणूस किती परिपक्क असतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजय बारस्कर महाराज आहेत. त्यांचे वडील स्व. साहेबराव बारस्कर यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. एकदा मी असाच बारस्कर महाराजच्या घरी आलो असता बाबांनी त्यांनी माझ्या हातात पाच हजार रुपये ठेवले. तुमच्या कार्यासाठी आमचा छोटासा हात भार असे म्हणाले.

त्यांनी संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदयात घालवले. ते उत्तम भारूड करीत होते. अनेक सदगुण स्व.बारस्कर महाराज यांच्यात होते. म्हणून बारस्कर कुटूंबाचा आदर्श समाजाने घ्यावा असे मत व्यक्त केले. राज्यमंत्री बच्चू कडू व डॉ. अशोक विखे पाटील यांनी प्रत्येकी 51हजार रुपये देणगी साहेबराव बारस्कर यांच्या स्मृतिप्रित्यार्थ  जाहीर केले. याप्रसंगी ह.भ.प. आबा महाराज कातोरे यांचे कीर्तन झाले.

यावेळी स्व.साहेबराव नारायण बारस्कर यांच्या स्मृतिप्रित्यार्थ विविध सामाजिक संस्था व देवस्थान यांना देणगी देण्यात आली. नागापूर ग्रामीण विकास मंडळ या संस्थेस ग्रंथालय निर्मितीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. अंध अपंग व निराधार लोकांना एक लक्ष रुपयांचा किराणा देण्यात आला, अहमदनगर  यतिमखाना, बूथ हॉस्पिटल , पाथर्डी येथील दिव्यांगासाठी काम करणार्‍या संस्थेला, निराधारांना आधार देणारी वडाळा येथील संस्था, भानसहिवरा नेवासा येथील वृद्धाश्रम,

कैकडी महाराज मठ, श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज देवस्थान वाहिरा,  भंडारा डोंगर ट्रस्ट, चक्रधर स्वामी संस्थान, नागापूर येथील बुध्दविहार अशा विविध संस्थांना अन्नदान आणि विविध साहित्य खरेदीसाठी देणगी देण्यात आली. दशक्रिया विधीसाठी उपस्थित प्रत्येकाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची सार्थ गाथा भेट देण्यात आली तर,बोल्हेगाव,नागापूर येथिल भजणी मंडळांना वीणा आणि पखवाज असे साहित्य  भेट देण्यात आले. या सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याबद्दल परिसरातून बारस्कर परिवाराचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post