40 हजाराची लाच घेताना दोन एजंट लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले

। अहमदनगर । दि.16 ऑक्टोबर । जातपडताळणी कार्यालयात तीन इसमांनी खोटे जातीचे दाखले काढून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे करिता अर्ज केला असल्याने त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या करिता दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजुने लावून देतो म्हणून लाच मागितली होती. त्याबाबतची लाच घेताना दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील एकाने लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, जातपडताळणी कार्यालयात, तीन इसमांनी खोटे जातीचे दाखले काढून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे करिता अर्ज केला.

त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या करिता दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजुने लावून देतो म्हणून हबीब बाबुभाई सय्यत (वय 52, धंदा शेती व खासगी एजंट) याने कार्यालयातील अधिकारी यांना एक लाख द्यावे लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर 13 ऑक्टोेबरला तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली.

सय्यद याची तक्रारदार याने भेट घेऊन एक लाखाचा ऐवजी 80 हजार देण्यावर दोघांमध्ये तडजोड झाली. त्यामधील 40 हजाराचा पहिला हप्ता देण्याचे ठऱले. राहुरी येथील स्टेशन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान हबीब सय्यद याने चाळीस हजाराची लाच तक्रारदार यांच्याकडून स्विकारुन ही रक्कम घेताना हबीब सय्यद व  शकील अब्बास पठाण ( वय 43, धंदा शेती व रजिस्टार कार्यालय राहुरी येथे एजंट) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.

हे पैसे संबंधित व्यक्ती कोणाला देणार होते, याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी होत आहे. जातपडताळणी कार्यालयात या व्यक्ती नेमक्या कोणाकडे येत होत्या. कशासाठी येत होत्या. याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post