पाईपलाईन फुटल्याने केडगावला पाणीटंचाई

। अहमदनगर । दि.14 ऑक्टोबर ।  स्टेशन रोडवरील सक्कर चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्यामुळे वसंत टेकडी ते केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन दिवसापूर्वी फुटली आहे. 

या जलवाहिनीमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट गेले आहे व जलवाहिनी तुंबली असल्यामुळे ताराबाग कॉलनी, एकता कॉलनी, अमित नगर, श्रीराम कॉलनी, धनश्री कॉलनी, चिपाडे मळा परिसरामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

 दरम्यान, या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाला नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली आहे. सक्कर चौक येथे केडगाव एमआयडीसीच्या टाकीला पाणी पुरवठा 

करणारी जलवाहिनी फुटल्याने तिची पाहणी नगरसेवक कोतकर यांच्यासह मनपाचे अभियंतागणेश गाडळलकर, शिवराज आनंदकर, बाळू रणे, गीते आदींनी केले व दुरुस्ती काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post