। अहमदनगर । दि.16 ऑक्टोबर । कोतवाली पोलिसांनी शहरातील माळीवाडा, धरती चौक, बुरुडगाव रोड या ठिकाणी छापा टाकून 7 पोते सुगंधी तंबाखू पकडली. धरती चौक येथे एक रिक्षा, 80 पुडे बुरुडगाव रोड, माळीवाडा येथे 10 गोण्या 100 किलो असा तीन लाख 70 हजार सातशेपन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतची माहिती अशी की पो. नि. संपत शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गोंधळे गल्ली माळीवाडा अहमदनगर या ठिकाणी संतोष प्रकाश सोनवणे (रा.सर्जेपुरा,अहमदनगर) हा महाराष्ट्र राज्यात तंबाखुजन्य पदार्थाचे विक्री करणे व कब्जात बाळगण्यास प्रतिबंध असतांना सुध्दा सुगंधी तंबाखुची गोण्यांमध्ये भरुन ठेवुन त्याची चोरुन विक्री करत आहे.
अशी खात्राशिर बातमी मिळाली असुन तुम्ही त्यावर कारवाई करा असा आदेश दिल्याने पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी अन्न व औषध प्रसासन विभाग अहमदनगर यांना त्यांचा फोन वर संपर्क केला. परंतु शासकिय सुटटी असल्यामुळे संपर्क झाला नाही.
पोसई मनोज महाजन यांनी कोतवाली पोलिस पथकास येथे मिळालेल्या बातमीची हकीकत सांगुन कार्यवाही करणे कामी खाजगी वाहनाने जाऊन जलाराम बेकरी या ठिकाणी वाहने उभे करून पायी चालत बेकरीचे पाठीमागे जावुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी अचानक छापा टाकला असता या ि6ठकाणी घरामध्ये एक इसम मिळुन आल्याने त्यास त्यांचे नावे पत्ते विचारले असता
त्याने त्याचे नाव संतोष प्रकाश सोनवणे (रा.सर्जपुरा) असे असल्याचे सांगीतले. त्याच्या घरझडती घेतली असता घरामध्ये सुगंधी तंबाखुचे गोण्या मिळून आल्या. 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे एकुण 100 किलो सुगंधी तंबाखु त्यामध्ये 10 गोणी मध्ये सोनेरी रंगाचे प्लॅस्टिक मध्ये प्रत्येकी 10 किलो वजनाचे मिळून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त केला.
बुरुडगाव रस्त्यावर भोसले मंगल कार्यालयाजवळ संतोष जैन (वय 35, रा.मोतीलनगर, केडगाव) याच्या ताब्यातून 24 हजार 500 रुपयांची सुगंधी तंबाखू पकडली तर धरती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर रिक्षा टेम्पोमधील (एमएच 16 एई 967) गोरक्षनाथ मच्छिंद्र धाडगे (वय 36, रा.बुर्हानगर) यांच्या ताब्यातून 96 हजार 250 रुपयांची सुगंधी तंबाखू हस्तगत करण्यात आली आहे.
या प्रकरणी तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून मुद्देमाल जप्त केला. तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.ही कारवाई पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मनोज महाजन, पोलिस उप निरीक्षक जी टी इंगळे,, पोलिस नाईक नितिन गाडगे, विष्णू भागवत, शहीद शेख, अभय कदम, शरद गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल सुमित गवळी, अतुल काजळे, श्रीकांत खताडे सुशील वाघेला, प्रमोद लहारे यांनी केली आहे.