वाळकीमध्ये किरकोळ कारणावरुन एकाचा खून

। अहमदनगर । दि.17 ऑक्टोबर । सायकल खेळण्याचा वाद लहान मुलांमध्ये झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना नगर तालुक्यात घडली आहे.

दोन लहान मुले सायकल खेळत होते. ती लावण्यावरुन त्या वादातून दोन गटात हाणामार्‍या झाल्या. त्यात एकाचा खून झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती नगर तालुका पोलिसांना समजली आहे.

या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Post a Comment

Previous Post Next Post