नगर शहरात पोलिसांवर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी शिवसेना- भाजप- काँग्रेस आक्रमक

 जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील शिष्टमंडळाने घेतली भेट 


। अहमदनगर । दि.07 सप्टेंबर ।  नगर शहरात पोलिसांना मॅनेज करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू झाल्याची तक्रार शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. मध्यंतरी काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर आयटी पार्क प्रकरणावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा आधार घेत शिवसेना- भाजपाचे शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिले आहे.

यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक योगीराज गाडे, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. नगर शहरामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने वारंवार विविध शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून अशा प्रकारे पोलिस यंत्रणेवर दबाव आणत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आमदार अनिल भैय्या राठोड हे जसे सामन्यांच्या मदतीला धावून जात होते  . सामन्यावर जर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अत्याचार केला तर  स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून पोलीसांना जाब विचारत होते त्या प्रमाणे आता शिवसेना नेते काम करेल  ज्यांच्यावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी शिवालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post