अतिवृष्टीचा इशारा, जिल्हा प्रशासनाकडून दक्षतेच्या सूचना

। अहमदनगर । दि.07 सप्टेंबर । भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. या कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 93.6 टक्के पाऊस झालेला आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांना आणखी पूर येऊ शकतो.

त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे नागरिकसांना दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. सखल भागातच राहणार्‍या नागरिकांनी तातडीने सुरक्षीतस्थळी स्थलांतर करावे, नदी, ओढे व नाल्याकाढच्या नागरिकांनी दक्ष रहावे, तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे, सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन आपत्ती प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post