। मुंबई । दि.24 ऑगस्ट । राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली. मात्र राज्यात डेल्टा प्लसचे आता 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. विशेषत: डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. डेल्ट प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे.
राज्यात आता डेल्टा प्लस रुग्णांची एकूण संख्या 103 झाली आहे. काल दिवसभरात डेल्टा प्लसचे 27 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता डेल्टा प्लसने राज्य सरकारची चिंता वाढवली असून नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्वाधिक रुग्ण अमरावती आणि गडचिरोतील सापडले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
अमरावती - 6
गडचिरोली - 6
नागपूर - 5
नगर - 4
यवतमाळ - 3
नाशिक - 2
भंडारा - 1
महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये सापडला होता. जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर जुलैमध्ये डेल्टा व्हेरिएंटची रुग्ण संख्या शून्यावर आली होती.
दि.14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती दिली होती. पण आता ऑगस्टमध्ये डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे आकडे सांगत असले तरी साथ संपलेली नाही. कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचं नागरिकांनी कठोर पालन करावं, असं आवाहन सरकारने केलं आहे.

Tags:
Breaking