कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

 कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

। अहमदनगर । दि.27 ऑगस्ट । कर्ज व कोरोनात आलेल्या आर्थिक संकटाला कंटाळून एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना शेवगांवातील अमरापूर येथे घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गोरक्ष रामकिसन पोटफोडे (वय 56) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

रामकिसन पोटफोडे यांनी गुुरुवारी सकाळी साडेअकराव वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षांपासून चालू असलेल्या कोरोनाने आलेली आर्थिक विवंचना निसर्गाच्या अवकृपेने झालेले शेतीचे नुकसान पाहता घेतलेले बँक कर्ज कसे फेडावे या विचाराने ते त्रस्त झाले होते. हाताला काम नाही, शेतीत उत्पन्न होत नाही.

त्यात मोठ्या प्रमाणान भाववाढ झाली आहे. कुटुंब कसे चालवावे आणि घेतलेले शेतीकर्ज कसे फेडावे, या विचारात ते सतत उदासिन होते. या सर्व कारणामुळे आता जगणे अशक्य असल्याची घरात ते आपली निराशा व्यक्त करीत होते. त्यांच्या कुटुंबानी त्यांना वारंवार धीर देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

मात्र, त्यांची मनस्थिती ठिक राहिली नाही. अखेर गुरुवारी सकाळी घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक किरण टेकाळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post