कपड्याचे दुकान फोडून दीड लाखाची चोरी

। अहमदनगर । दि.24 ऑगस्ट । दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक तोडून चोराने आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक केली आणि आतील रोख रक्कम व विविध प्रकारचे कपडे  मिळून सुमारे दीड लाखाचा माल चोरुन नेला.

सदरची ही घटना तपोवन रोडवरील हॉटेल इंद्रायणी समोर असलेल्या हर्ष कलेक्शन या कपड्याच्या दुकानात घडली आहे.

याबाबतची माहिती अशी की दिनेश बाबासाहेब गाडे (वय 36, राहणार शुभश्री प्लाझा, छत्रपतीनगर, तपोवन रोड, सावेडी, अ.नगर) यांचे तपोवन रोडवरील इंद्रायणी हॉटेलसमोर हर्ष कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे.

या कपड्याच्या दुकानाचे शटरचे सेंटर लॉक तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक करून बनियनचे 43 बॉक्स,29 जिन्स पँट, 32 शर्टस,33 लेडीज टॉप पीस, ड्रेस, लहान मुलांचे बाबा सुट 39 पीस व रोख रक्कम असे एक लाख 59 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी दिनेश गाडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास सहाय्यक पोलिस अधिकारी भान्सी करीत आहे.

शहर व उपनगरामध्ये चोरट्यांनी आता किराणा व कापड दुकानांवर डल्ला मारण्यास सुरवात केली की काय ? असाच प्रश्‍न येथील नागरीकांनी उपस्थित केला आहे. शहरात आणि उपनगरामध्ये चोरट्यांनी दुचाकी चोरी, भुरट्या चोर्‍या बरोबरच आता विविध व्यवसायीकांच्या दुकानावर चोर्‍या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. चोरट्यांवर जबर बसवण्यासाठी गस्त वाढविण्याची मागणी पुढे येत आहे.
 

Post a Comment

Previous Post Next Post