पोलिसाला शिवीगाळ धक्काबुक्की करून चौघांकडून मारहाण

। अहमदनगर । दि.19 जुलै । जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दुपारी चार वाजता असताना असताना बंद करण्यास सांगणार्‍या पोलिसात चौघांनी शिवीगाळ दमदाटी करीत धक्काबुक्की करून मारहाण केली.

ही घटना राहता तालुक्यातील दाढ येथील विरभद्र मंदिरासमोर घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की पोलीस नाईक संतोष लांडे (वय 37 नेमणूक लोणी पोलीस ठाणे)  हे जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये नगर जिल्ह्यात विषाणूचे वाढत असलेल्या प्रादुर्भावाचे अनुषंगाने जिल्ह्यात लागू असलेल्या आदेशाने आस्थापना बंद

करीत असताना दाढ गावातील विरभद्र मंदिरासमोरील गणेश जेजुरकर यांचे चालू असलेले विरभद्र किराणा दुकान बंद करण्याचे सरकारी काम करीत असताना योगेश जेजुरकर, पप्पू टाक, रवींद्र टाक, रमाकांत जेजुरकर ( सर्व. रा दाढ ता. राहता) यांनी लांडे यांना शिवीगाळ करीत यांच्या अंगावर हल्ला केला.

त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत यांच्या डाव्या बरगडीवर मारहाण केली. आणी सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी संतोष लांडे यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post