आषाढी वारीचा तिढा सुटला...वाचा सविस्तर

। पुणे । दि.11 जून । आषाढी वारीचा तिढा सुटला असून त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू आळंदीत प्रस्थानासाठी 100 वारकर्‍यांना परवानगी दिली आहे. तर प्रस्थान सोहळ्यात 50 वारकर्‍यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या काळात पालखी सोहळा बसमधुन झाला होता. यंदाच्यावर्षीही सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू आळंदीत प्रस्थानासाठी रवाना होतील. मानाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात 50 वारकर्‍यांना परवानगी देण्यात आली आहे.

यावर्षीही पालखी सोहळा बसमधूनच होणार आहे. पंढरपूरपर्यंत पायी वारी यावर्षीही होणार नाही. मात्र यावर्षी दोन बसेस पालखी सोहळ्यासाठी देण्यात आल्या आहेत. इतर वारकरी मात्र दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. मंदिर अन्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद असेल, असा महत्त्वपुर्ण निर्णय घेतल्यात आला आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post