। नवी दिल्ली । दि.25 जुलै 2026। केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
गेल्या काही काळापासून शिक्षण मंत्रालयाच्या कारभारावरून विरोधकांकडून सतत टीका होत होती, तसेच नीट पेपरफुटी प्रकरण आणि विविध परीक्षांमधील गोंधळाच्या मुद्द्यावरून त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती.
कॉक्रोच जनता पार्टीकडून प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण, आंदोलन सुरू केले होते. अखेर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती समोर आली आहे.
Tags:
Breaking
