। मुंबई । दि.13 जून । राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ’सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी उभयतांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. भेटीचे कारण तसेच चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी महाराष्ट्राच्या राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
देशातील यूपीएचे नेतृत्व आणि भाजपाविरोधातील आव्हान उभे करण्यासाठी खलबते झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे राजकीय वातावरण पवार-किशोर भेटीने ढवळून निघाले आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट निश्चितच देशाच्या राजकारणात खळबळ उडवणार का ? असाच प्रश्न पडला आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील ’सिल्व्हर ओक’ निवासस्थानी प्रशांत किशोर शुक्रवारी सकाळी दाखल झाले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केले. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. या भेटीनंतर शरद पवार आणि आमदार रोहित पवार पुण्याकडे रवाना झाले असल्याचे सांगण्यात आल आहे.