। अहमदनगर । दि.13 जून । आज 12 जून रोजी पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, केरळ राज्यातील चंदन तस्करांची टोळी राहुरी हद्दीतून बुर्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार आहे. या माहितीवरून राहुरी कारखाना येथे मिटके यांच्या पथकाने सापळा लावून छापा टाकला. या छाप्यात अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे चंदन (650 किलो चंदन प्रति किलो 9500 रुपयांप्रमाणे) आणि 10 लाखांचे वाहन असा एकूण 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या छाप्यातील आरोपी अब्दुल मोहम्मद निसाद (वय- 32 वर्षे, राहणार अंजामैल हाऊस ता. बैदाडका जिल्हा कासारगोड, केरळ), अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय-41 वर्षे, रा.अमितकला हाऊस ता.ऐनमाकजा, जिल्हा कासारगोड,केरळ) यांच्याविरुध्द राहुरी पोलिस स्टेशन जि. अहमदनगर येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील , अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके, मधुकर शिंदे, निलेश कुमार वाघ, सहायक फौजदार राजेंद्र आरोळे, पोहेकॉ सुरेश औटी, पोलिस नाईक जानकीराम खेमनर, पोलिस कॉन्स्टेबल गणेश फाटक, किशोर जाधव, सुनील दिघे, राहुल नरोडे, होमगार्ड तुषार बोराडे, रमेश मकासरे आदींनी केली.
संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
