। अहमदनगर । दि.08 जून । घरात कोणीही नसताना दोन मोबाईल हॅण्डसेट चोरून नेल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गणेश दिवाणजी काळे (रा.वाकोडी फाटा, नगर) या आरोपीस अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
दि.16 मे 2021 रोजी रणजितसिंग छोटेलाल यादव (रा.वाकोडी फाटा,नगर) हे आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून दोन मोबाईल हॅण्डसेट चोरून नेले होते. अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी त्यांनी कॅम्प पोलिसांकडे गुन्हा नोंदविला होता.
भिंगार कॅम्प पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फतही या चोरीचा समांतर तपास सुरू होता. मोबाईल हॅण्डसेट चोरणार्यास अटकस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्याकडून आरोपी गणेश काळे याची माहिती मिळाली.
पोलिस कर्मचारी फकीर शेख, विश्वास बेरड, शंकर चौधरी, दिपक शिंदे, कमलेश पाथरुट, मदन गायकवाड, संभाजी कोतकर आदींनी वाकोडी फाटा परिसरात शोध घेऊन गणेश काळे यास अटक केली. आरोपी गणेश काळे याच्याविरुद्ध भिंगार व तोफखाना पोलिस येथे चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत.
