। अहमदनगर । दि.08 जून । चाळीस वर्षीय महिलेस अज्ञात चोरांनी आडवून मारहाण करून तिच्याकडे सोन्याचे दागिने मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने चोरून नेला. ही घटना नगर पुणे रोडवरील कामरगाव येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की येथील चाळीस वर्षे महिला रस्त्याने जात पायी असताना अज्ञात चोरांनी तिला अडवून मारहाण करून तीचाकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा 51 हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरून गेला. ही घटना नगर पुणे रोड वरील कामरगाव येथे घडली.
याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी शुभांगी विजय जाधव ( वय.21 राहणार कामरगाव तालुका नगर ) यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करीत आहेत.
