। अहमदनगर । दि.03 जून । श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जालिंदर जगधने यांच्या शेतातील विहिरीजवळ दीड वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे.
टाकळीभान ते कारेगाव रस्त्यालगत जालिंदर जगधने यांची शेती आहे. तेथील विहिरीजवळ नर जातीचा दिड वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला.
ही माहिती जगधने यांचे नातलग भास्कर साळुंके यांनी उपसरपंच कान्हा खंडागळे यांना सांगितली असता खंडागळे यांनी वन विभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच श्रीरामपूर येथील वनरक्षक विकास पवार यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा पंचनामा केला.
या मृत बिबट्याने विषारी काहीतरी भक्षण केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनरक्षक विकास पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी हेड कॉन्स्टेबल अय्युब शेख, होमगार्ड हाळनोर जिवरग, बाबा सय्यद, ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, अभिजित कापसे, अमीत कापसे, मधुकर मैड, ग्रामपंचायत सदस्य सुनिल बोडखे, विलास सपकळ, राम बोडखे, भास्कर साळुंके, सुरेश बनकर आदी उपस्थित होते.