। अहमदनगर । दि.03 जून । करोना महामारीत सर्वसामान्य नागरिक एकमेकांना आधार देण्याचे काम करती आहेत. कोरोना महामारी अटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. परंतु, काही हॉस्पिटलकडून करोनाग्रस्तांची आर्थिक लूट होत आहे. ती रोखण्यासाठी, यासाठी आता प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेने पुढाकार घेतला आहे.
रुग्णांची लूट करणार्यांची पोलखोन करणार आहेत. हॉस्पिटलकडून सुरु असेलली नियमबाह्य आर्थिक लूट थांबवी, त्याला आळा बसावा, याउद्देशाने प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीने पुढकार घेतला असून कोरोनाग्रस्तांची आर्थिक लूट करणार्या हॉस्पिटलची त्यासाठीच पोलखोल करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ चिंधे यांनी दिली आहे.
साधारण सव्वा वर्षापासून कोरोना महामारीने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल केले आहे. असे असताना अशा प्रकारची लुट खूपच क्लेशदायक व लाजिरवाणी आहे.त्यामुळे आता समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ चिंधे, जिल्हा उपाध्यक्ष जावेद सय्यद व सचिव दत्तात्रय म्हसे यांनी रुग्णांना दिलासा देण्याचे काम हाती घेतले असल्याचे सांगितले आहे.
