छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्य निर्माण झाले : इंजि.सुरेश इथापे

। अहमदनगर । दि.06 जून । संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणार्‍या आणि दिल्लीपर्यंतही आपल्या कर्तृत्त्वानं शत्रूला थरथर कापायला भाग पाडणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे लहान-थोरांपासून सर्वांनाच ज्ञात आहे. महाराजांची कारकिर्द ही प्रत्येकाला हेवा वाटेल आणि उर अभिमानानं भरुन येईल अशी आहे. अशाच या कारकिर्दीतील, जीवन प्रवासातील एक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय. रयतेचे राज्य निर्माण करुन छत्रपती शिवाजी महाराज ‘राजे’ झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्य निर्माण झाले, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेत शिवराज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे, शहर बँकेचे संचालक संजय घुले,
मराठा पतसंस्थेचे व्हा. चेअरमन सतिष इंगळे,. संचालक ज्ञानेश्‍वर अनभुले, डॉ.विजय कवळे, अशोक वारकड, प्रियंक बेलेकर, रिजवान शेख, ठाकूरदास परदेशी आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post