चोर समजून झालेल्या मारहाणीत परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

। अहमदनगर । दि.06 जून । संशयित रित्या फिरणार्‍या परप्रांतीयास चोर समजून नागरिकांनी केलेल्या मारहाणीत परप्रांतीयांचा गंभीर जखमी होऊन उपचारा  दरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील 28 चारी रोड, शिंगणापूर तालुका कोपरगाव येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर 28 चारी रोड शिंगणापूर  येथे फिरणार्‍या वासुदेव तुफान माडी ( वय 40 राहणार बालोरिया दक्षिन दिनाजपुर पश्‍चिम बंगाल ) या परप्रांतीय परिसरात फिरताना पाहून तेथील नागरिकांना तो चोर असल्याचा संशय आला यावरून नागरिकांनी त्यास पकडले.

चोर समजून त्यास लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यावेळी अमोल विठ्ठल सवत्सरकर याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारले. या मारहाणीत वासुदेव माडी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे ( वय 35 नेमणूक कोपरगाव पोलीस ठाणे ) यांच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र श्रावण संवत्सरकर, अमोल विठ्ठल संवत्सरकर, बापू गोरख संवत्सरकर, सुरेश पांडूरंग दादरे ( सर्व राहणार 28 चारी रोड शिंगणापूर कोपरगाव ) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस निरीक्षक देसले हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post