। अहमदनगर । दि.03 जून । सावेडी परिसरातील एकनाथ कोतकर यांच्या फार्महाऊमध्ये असलेल्या एक लाख 82 हजार 500 रुपये किंमतीची तांब्याची तार अज्ञात चोराने चोरुन नेली.
ही घटना सावेडी परिसरात घडली. या बाबतची अधिक माहिती अशी की, एकनाथ कोतकर यांच्या फार्महाऊसमध्ये असलेल्या एक लाख 12 हजार 500 रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारीचे बंडल आणि 70 हजार रुपये किंमतीचे लहान बंडल असे एक लाख 82 हजार 500 रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा चोरट्याने चोरुन नेल्या.
याबाबत योगेश श्रीकृष्ण बेलवलक (रा.डोंबवली, ठाणे, सध्या तपोवन रोड, सावेडी) याच्या फिर्यादीवरुन चोरीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली.