फडणवीस यांच्या भेटीनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीला

। मुंबई । दि.02 जून । गेल्या दोन दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी पवारांची भेट घेतली आहे. या भेटींमुळे आता महाराष्ट्रात पुन्हा राजकारणावरील चर्चा रंगताना दिसत आहे.

गेल्या काही दिवासंपासून महाराष्ट्रातील राजकारणात भेटीगाठी करण्यात येत आहेत. आज राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. दोन दिवसापुर्वी देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौर्‍यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 31 मे रोजी शरद पवारांची भेट घेतली. ही सदिचछा भेट असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यानंतर फडणवीस जालनाच्या दौर्‍यावर गेले. या दौर्‍यात त्यांनी एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. 

 या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे याची चर्चा राजकीय वर्तुळा सुरु झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post