बोकड चोरणारी टोळी जेरबंद ; सात गुन्हे झाले उघड

अहमदनगर  । दि.29 मे । शेतकर्‍यांच्या बकर्‍या व बोकड चोरणारे व विकत घेणारे चौघे जेरबंद व सात गुन्हे उघडकीस आले  ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली आहे. या कारवाईत  नितीन जयशिंग काळे, (वय 35 रा.जावळे मळा, पोखडी शिवार, ता. नगर ,) दान्या फाजल्या चव्हाण, (वय 50 रा. जावळे मळा, पोखर्डी शिवार, ता. नगर, )  संजय दान्या चव्हाण, (वय 22) व  एक विधीसंघषित बालक यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.  

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांची नावे शकील शेख व महमंद शेख, दोघे रा. झेंडीगेट,  शकील बाबू शेख, वय- 54 वर्षे, रा. इदगाह मैदान, झेंडीगेट, नगर,  महमंद हनिफ शेख नजीर, वय 35 वर्षे, रा. नगर सांगितले असून यांचाही गुन्ह्यात समावेश असल्याचे सांगितले. शनिवारी (दि.1) रात्री राजेन्द्र आसाराम माटे, ( वय 32 रा. पोखर्डी, ता. नगर) हे त्यांच्या बकर्‍या व बोकड घरासमोर बांधून झोपले असताना चोरट्यांनी त्यांचा 6,000/-रुपये किंमतीचा बोकड चोरुन नेला होता.

त्याबाबत एमआयडीसी पो.स्टे.येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर  अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नगर हे त्यां पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि अनिल कटके यांना गुप्त खबन्याकडून माहिती मिळाली कि, हा गुन्हा हा नितीन काळे, (रा.पोखर्डी,शिवार) याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, स.फौ मन्सूर सय्यद, सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ संदीप घोडके, पोना,शंकर चौधरी, पोकों शिवाजी ढाकणे, रविन्द्र घुंगासे, रोहीदास नवगीरे, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे, यांनी मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेवून आरोपी   नितीन जयशिंग काळे, ( वय- 35 रा. जावळे मळा, पोखडी शिवार,ता.नगर) यांस प्रथम ताब्यात घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post