। अहमदनगर । दि.29 मे । पोलीस असल्याची बतावणी करून लाखो रुपयांचे स्क्रॅप असलेले वाहन चालकाला दमबाजी करून पळून नेल्याची घटना राहुरी विद्यापीठ परिसरात घडली. चोरट्यांनी आधी चालकाचे अपहरण केले व नंतर त्याला वरवंडी शिवारात निर्जनस्थळी सोडून स्क्रॅप असलेले वाहन घेवून पोबारा केला.
याबाबत श्रीधर जंगलु सोनवणे (वय 34, रा. एकलहरे, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मी माझे वाहन (क्रमांक एम. एच. 42 एम.9482) या ट्रक मधून स्क्रॅपमटेरियल घेऊन नगर-मनमाडरोड वरून धर्माडी टेकडी राहुरी येथून जात असताना अनोळखी चार चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली.
वाहन रस्त्यावर थांबून विना नंबरच्या ईरटीका गाडीमध्ये मला बळजबरीने बसून शिवीगाळ व दमदाटी करून तसेच माझे अपहरण केले. एका चोरटयाने माझ्या तब्येतीला स्क्रॅपने भरलेले वाहन ताब्यात घेऊन नगरच्या दिशेने नेले. वरवंडी गावचे शिवारामध्ये मला निर्जन जागेवर गाडीतून उतरून देऊन शिवीगाळ करून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सोडून दिले.
माझ्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचे वाहन तसेच त्यामध्ये असलेले जवळपास पंधरा लाख रुपये किंमतीचे विविध प्रकारचे स्क्रॅप घेऊन सदर चोरटे पसार झाले आहेत. याबाबत श्रीधर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा भा.द.वि. कलम 327, 363,180 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील हे करत आहेत.