। अहमदनगर । दि.28 मे । कोरोना महामारीत मजुर संस्थांची व मजुरांची फार दाननीय अवस्था झाली आहे. या संकटांमध्ये अनेक मजूर संस्थांचे चेअरमन व काम करणार्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात अनेकांचे उपचारा अभावी दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा मजूर फेडरेशनने तातडीने जिल्हा मजूर संघाच्या सर्व सभासदांचा कोव्हीड -19 चा विमा उतरवून आरोग्य विमाचे कवच द्यावे अशी मागणी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.
जिल्हा मजूर फेडरेशनच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक प्रशांत गायकवाड यांनी निवेदन देवून विमा कवच देण्याची मागणी केली. निवेदनात म्हंटले आहे कि, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील मजूर संस्थांना तीन लाखांच्या आतील कामाचेच वाटप होत असल्याने आधीच अडचणीत असलेल्या संस्था गेल्या दीड वर्षांपासून असलेल्या कडक निर्बंधांमुळे त्यांच्यावर नवे संकट ओढावलेले आहे.
करोनामुळे अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सभासदांचा कोव्हीड -19 चे संरक्षण असेलेला विमा तातडीने उतरवावा असे निवेदन श्री प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी दिले. यावेळी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी लवकरच सर्व मजूर सभासदांना 2 लाखां पर्यंतचे कोव्हीड -19 विमा उतरवण्याचे आश्वासन देण्यात आले.