। मुंबई । दि.28 मे । चंद्रपूर आणि गडचिरोतील गुन्हेगारी वाढले असल्याचं कारण येथील दारुबंदी उठवण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ पु्हा एकदा संतापल्या असून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी दारूबंदीसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत चित्रा वाघ यांन राज्य सरकारवर टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीटरमधून राज्यातील महिला वर्गाला आवाहन केलं आहे. “दिवंगत नेते आर. आर. आबा यांनी उभी बाटली, आडवी बाटली करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवटी रिचवलीच. भगिनींनो, संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा. परत चार हात करायची वेळ आणली या सरकारने आपल्यावर”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
