महापौर निवडणुक : शिवसेनेचे पदाधिकारी थेट मुख्यमंत्र्यच्या भेटीला

अहमदनगर   । दि.28 मे । शिवसेनेच्या नगर शहरातील नेत्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुंबईमध्ये भेट घेतल्याने महापौर कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महापौर निवडणुकीचा प्रस्ताव महापालिकेच्या आयुक्तांनी विभागिय आयुक्तांकडे सादर केल्यानंतर शिवसेना पदाधिकार्‍यांची भेट ही नगर शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेटी वेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसैंदर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगांवकर, संजय शेंडगे, नगरसेवक अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post